शेवाळाचे फायदे

महाराष्ट्र राज्यात एकूण १.४२ दशलक्ष हेक्टर जमीन भात लागवडीसाठी आहे. भात पिकवणारे बरेच शेतकरी अल्पभुधारक असून त्यांना रासायनिक किंव्हा अन्य महागडी खते वापरणे परवडत नाही. नत्र खत भात सेतीस अत्यंत आवश्यक आहे. रासायनिक खतातून पिकांना दिलेल्या नत्राच्या मात्रेपैकी फक्त ३५% नत्रच भात पिकास मिळतो आणि उरलेला नत्र पाण्याबरोबर वाहून किव्हा हवेत जातो. निळ्या हिरव्या शेवाळाच्या वापरामुळे भात पिकला जास्तीत जास्त नत्र मिळतो. व वापरलेल्या नत्राचा पुरेपूर उपयोग करून घेता येतो. हवेमध्ये पिकांना न वापरता येणारा ७८% नत्र असतो. निळे-हिरवे सेवादे हवेतील या नत्राचे रुपांतर उपलब्ध होण्याऱ्या स्वरूपात विना आर्थिक खर्चात होते.

निळे –हिरवे शेवाळे :
नदीच्या पाण्यात किंव्हा साठलेल्या पाण्याच्या डबक्यात अनेक प्रकारचे शेवाळे वाढताना दिसते. त्यात प्रामुख्याने दोन प्रकारात आढळतात, एक म्हणजे पिकांना उपयोगी न पडणारे निळे हिरवे शेवाळे, ही एकपेशीय लांब तंतुमय पान वनस्पती आहे. तिच्या पेशीमध्ये हरितद्रव्य असून ती सूर्यप्रकाशात स्वत:चे अन्न तयार करते व हवेतील मुक्त नत्र स्थिर करून ते भात पिकाला उपलब्ध करून देते.

निळ्या –हिरव्या शेवाळाचे फायदे :
१)अॅनाबिना   २)नॉस्टॅाक    ३)आलोसिरा   ४)लिंगबिया    ५)ओसिलाटोरीया  ६)टोलीप्रोथ्रीक्स  ७) प्लेक्टोनिमा ८)सिलेंड्रोस्परमम्र् ,

निळे –हिरवे शेवाळाचे फायदे :
१) हवेतील मुक्त नत्र स्थिर केला जातो.
२) हंगामी प्रती हेक्टर २५-३० किलो नत्र स्थिर केला जातो.
३) जमिनीचा सेंद्रिय पदार्थांचनची वाढ होते.
४) जमिनीची पोट सुधारतो
५) जमिनीमध्ये उपयोगी जीवाणू उदा.स्फुरद जीवाणू इत्यादिची वाढ होण्यास मदत होते.
६) जमिनीची धूप कमी होते
७) उत्पनामध्ये १०-१५ टक्के वाढ होते व नत्राची मात्रा कमी करता येते.

निळे –हिरवे शेवाळ तयार करण्याची पद्धती :

१) निळे –हिरवे शेवाळ तयार करण्याची पद्धत सोपी असून शेतकरी ते स्वत:तयार करू शकतात.
२)  शेतामध्ये मोकळ्या जागेवर २मि*१ मी आकाराचे व ०.२० मी उंचीचे खड्डे अथवा वाफे तयार करावेत. सोयीनुसार वाफ्याचा आकार कामी जास्त करता येतो.
३) मातीच्या खड्ड्यावर अर्थवा वाफ्याचा (१५०-२००) मायक्रॉन जाड कागद अंथरावा.
४) त्यावर ९-१०किलो बारीक चाळलेली माती टाकावी. त्यामध्ये २०० ग्रॅम पोटॅशिय क्लोराईड मिसळावे.
५) १० सें मी उंचीएवढे पाणी भरावे व माती सर्व मिश्रण चांगले ढवळून ध्यावे.
६) पाणी स्थिर होऊन पाणी भरावे व माती राहील सर्व मिश्रण चांगले ढवळून ध्यावे. निळ्या –हिरव्या शेवाळाच्या मातृवाण्याची भुकटी सगळीकडे टाकावे. नंतर पाणी ढवळू नये

७) निळे –हिरवे शेवाळ तयार करण्यासाठी माती शक्यतो उदासीन असावी.
८) भरपूर सूर्यप्रकाश व उष्णता असल्यास साधारणपणे ११-१३ दिवसांत शेवाळाची चांगली वाढ होऊन बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी कमी –कमी होते
९) माती पूर्ण सुकल्यानंतर शेवाळाची वाढ मातीपासून अलग होवून त्याच्या पापड्या तयार होतात. या पापड्या गोळा करून पिशव्यांमध्ये भरून ठेवाव्यात.
१०) निळे –हिरवे शेवाळ अशा प्रकारे तयार करता येते

शेतीमध्ये निळ्या –हिरव्या शेवाळाचा वापर व घ्यावयाची काळजी : 
१) भाताची पूर्ण लागण झाल्यावर ८-१० दिवसांनी शेवाळे शेतामध्ये फोकून ध्यावे.
२) भाताच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी सेंद्रिय नत्र खताची प्रामाणीत मात्रा व २०-२१ किलो शेवाळे प्रती हेक्टर वापरावे.
३) रासायनिक खते, औषधे व शेवाळे एकत्र मिसळून वापरू नये. त्यांचा स्वंतत्ररित्या वापर करने गरजेचे आहे.
४) रासायनिक खंताच्या संपर्कात किंव्हा रिकाम्या झालेल्या रासायनिक खंताच्या पिशव्यांमध्ये शेवाळे साठवून ठेवू नये.
५) भात शेतात किटकनाशके,बुरशीनाशके व तणनाशकांच्या प्रमाणित वापरावा शेवाळावर अनिष्ट परिणाम होत नाही.

Comments

Post a Comment