फार्मिंग 3.0

भारतातील 50 टक्‍क्‍यांहून अधिक रोजगार शेतीतून निर्माण झालेले आहेत. परंतु, 80 टक्‍क्‍यांहून अधिक शेतकरी लहान व अल्प भूधारक आहेत, त्यामुळे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शतीची उत्पादकता वाढण्याची गरज असल्याचे महिंद्रा ऍग्री सोल्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक अशोक शर्मा यांनी सांगितले.

23 डिसेंबर हा भारतीय शेतकरी दिवस पाळला म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त बोलताना ते म्हणाले की, प्रवासाच्या बाबतीतील सर्वात मोठ्या कंपनीकडे स्वतःची एकही कार नाही. सर्वात मोठ्या हॉटेल साखळीचे स्वतःच्या मालकीचे एकही हॉटेल नाही. स्वयंचलित कारचे उत्पादक म्हणून गूगल व ऍपल हे जगातील सर्वात मोठे ऑटोमेकर्स स्पर्धक असतील.

शेती क्षेत्रातही असे बदल घडू शकतात. शेती क्षेत्रामध्ये अजूनही डिजिटायझेशनचा प्रवेश तितका झालेला नाही. तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास पूर्णपणे नवी क्रांती निर्माण होईल व त्पादकता व भरभराट यांची सुगी येऊ शकेल.

भारतात जमिनीचे लहान तुकडे असल्यामुळे आणि 50 टेक्‍क लोक शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना ना उत्पादनाचे वा प्रक्रिया तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करण्याचे धाडस होते, ना अधिक उत्पादन देणारे बियाणे व खते यांचा वापर करण्याची इच्छा होते. कमी उत्पादकता व कमी उत्पन्न असे दुष्टचक्र निर्माण झाले आहे असे ते म्हणाले.तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने भारतातील शेतीतील क्षमता वाढवून व शेतकऱ्यांची भरभराट करून हे दुष्टचक्र मोडले जाऊ शकते. अनेक पद्धतीने हे काम सुरू झाले आहे.

स्मार्टफोनच्या वाढत्या प्रमाणामुळे शेतकऱ्यांसाठी नवे पर्याय खुले होत आहेत. या परिवर्तनाला आम्ही फार्मिंग 3.0 म्हणतो. साठच्या मध्यापर्यंत चाललेल्या फार्मिंग 1.0 चे मुख्य वैशिष्ट्य जमीनविषयक सुधारणा हे होते. दुसरा टप्पा किंवा फार्मिंग 2.0 ची सुरुवात 1960 मध्ये झाली व त्याचे उद्दिष्ट भारताला अन्नाच्या बाबतीत सुरक्षित करणे हे होते. त्यातून ट्रॅक्‍टर, बियाण्यांचे अनेक प्रकार, जलसिंचन मिळाले, आता नेमकेपणाने शेती करणे ही काळाची गरज बनणार आहे. ही क्रांती प्रत्यक्षात आणण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

हा संपूर्ण टप्पा नावीन्य, डिजिटल क्रांती व नेमकेपणाने शेती यांचा असणार असून, त्यामुळे या आव्हानांना तोंड देण्यासाठी मदत होणार आहे. आमच्या शेतकरी-केंद्रित विविध उपक्रमांमध्ये, महिंद्राने डिजिटल सुविधा निर्माण केली असून त्यामुळे स्मार्टफोनच्या मदतीने शेतीशी संबंधित विषयांवरील माहिती शेतकऱ्यांमध्ये सहज उपलब्ध करता येऊ शकते.

तंत्रज्ञानावर आधारित आणखी एक उपक्रम म्हणजे ट्रिंगो ही ट्रॅक्‍टर भाड्याने देणारी सेवा. शेतकऱ्यांना जेव्हा जेव्हा ट्रॅक्‍टरची गरज असते तेव्हा त्यांना आमच्या या सेवेमार्फत भाड्याने घेता येऊ शकतो. ही केवळ सुरुवात आहे व वरवरचे चित्र आहे. उदाहरणार्थ, एका विश्‍वाची कल्पना करा, जेथे माहिती गोळा करणारे ड्रोन शेतावर फिरत आहेत, पिकाखालील क्षेत्र उपग्रहांद्वारे मोजले जात आहे, स्मार्ट शेती उपकरण हवामान, मातीची स्थिती व विशिष्ट पिकासाठी आवश्‍यक असलेले पाणी याचे परीक्षण करत आहे. कार्यक्षमतेमुळे उत्पादनात वाढ होईल, तर खर्चात कपात होईल अशा या पद्धतीला महत्त्व येणार आहे.

Comments