ई-परिक्षक

पंजाब मधील विद्यार्थांनी बनवले 'भन्नाट' यंत्र, कृषी क्षेत्रात घडेल क्रांती :
 सामान्य व्यक्तींच्या जीवनात स्मार्टफोनने आगमन केल्यापासून दैनंदिन जीवन सोपे झाले आहे. तसेच कमी वेळात चांगल्या प्रतिचे काम करण्याची क्षमताही मानवात विकसीत झाली. शेती क्षेत्रात अशा प्रकारचे मर्यादित प्रयोग झाले आहेत. असाच एक प्रयोग पंजाबमधील दोन विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यांनी एक आधुनिक तंत्र बनवले आहे. यामुळे शेतकऱ्याची बरीचशी कामे एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. या तंत्रामुळे शेती क्षेत्रामध्ये नव्याने कृषीक्रांती होऊन स्मार्ट फार्मिंगची नवी संकल्पना रुजु होईल, अशी आशा या विद्यार्थांना आहे.

काय आहे यंत्र :
ई-परिक्षक असं या तंत्राचे नाव असुन हे यामध्ये विशेष टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
हे यंत्र आपण १० किलोमिटर अंतरावरुनही नियंत्रित करु शकतो. जमीनीची उत्पादकता, पाण्याची पातळी, जमीनीचे तापमान, आर्द्रता अशा सर्व गोष्टींची माहिती मिळवण्याची क्षमता या यंत्रात आहे. ही सर्व माहिती या यंत्राच्या क्लाउड स्पेसमध्ये साठवली जाते. 

काय फायदा :
तसेच या माहितीचा वापर करुन भविष्यात आपल्या शेतीत कोणते पीक चांगल्याप्रकारे पीकू शकते याची अधिकची माहिती किंवा सल्ला या यंत्राद्वारे आपल्याला मिळू शकेल. तसेच पीकांवर होणाऱ्या वेगवेगळ्या रोगांची वाढीव माहिती आपल्याला अगोदरच मिळेल. यामुळे शेती क्षेत्रातील दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीला चाप बसेल.

कुणी बनवला :
हे यंत्र महेंद्र स्वेन आणि वसिम अक्रम या दोन विद्यार्थांनी बनवले आहे. ते 'लव्हली प्रोफेशनल युनिव्हरसिटी'चे विद्यार्थी असून "इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग" या विषयात पीएचडी करत आहेत. राजेश सिंग आणि अनिता गेहलोत हे त्यांचे पीएचडीचे मार्गदर्शक आहेत. हे यंत्र पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या शेतीत वापरू शकतो. *यासाठी इंटरनेटचीही गरज भासत नाही.*सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे यंत्र आपण १० किमी वरुनही नियंत्रित करु शकतो. तसेच मेश प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर केल्यास हे यंत्र १५ किमीवरुनही नियंत्रित करता येऊ शकते.

या यंत्राचा वापर केल्याने जमीनीची उत्पादकता, पाण्याचा निचरा करण्याची क्षमता, जमीनीतील तापमान, आर्द्रता इत्यादी बाबींवर लक्ष ठेवण्यात, तसेच सेन्सरच्या माध्यमातून पाण्याचे पंप बंद-चालूही करता येतील. या यंत्राद्वारे माहिती साठवल्याने आणि कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करुन आपल्या शेतीसाठी पोषक पीक कोणते असू शकते याची परिपूर्ण माहिती शेतकऱ्याला मिळू शकेल, यामुळे शेतकरी सक्षम होईल.

महेंद्र स्वेन, विद्यार्थी (लव्हली प्रोफेशनल युनिव्हरसिटी)

Comments