उशिराच्या छाटणीमुळे-निर्माण होणाऱ्या समस्या :

उशिराच्या छाटणीमुळे-निर्माण होणाऱ्या समस्या :

१) द्राक्ष बागेस पुरेशी विश्रांती न मिळणे : 
द्राक्ष काढणीनंतर द्राक्ष बागेस विश्रांती मिळणे आवश्‍यक असते. द्राक्ष काढणीनंतर वार्षिक खतांच्या मात्रांपैकी उरलेली दहा टक्के खतांची मात्रा देऊन पाणी सुरू ठेवावे, त्यामुळे मुळांची वाढ होऊन त्याचा फायदा छाटणीनंतर निघणाऱ्या फुटींवर होतो. द्राक्ष बागेत विश्रांती देणे म्हणजे खते व पाणी देऊन वेलीस पुनरुज्जीवित करणे होय; मात्र अनेक द्राक्ष बागायतदार द्राक्ष काढणीनंतर बागेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात व अप्रत्यक्षपणे ताण देतात, हे पूर्णपणे अयोग्य आहे. विश्रांतीच्या काळामध्ये वेलीतील अन्नसाठ्यातील उत्पादनकाळात झालेला खर्च भरून काढला जातो. विश्रांती कमी मिळाल्याने फुटीच्या वाढीसाठी आवश्‍यक ऊर्जा मिळत नाही.

Comments